मुंबई, २७ जुलै २०२३ : जगात असे अनेक नेते आहेत ज्यांना आपले अनैतिक संबंध उघडकीस आल्यामुळे त्यांची कारकीर्द धोक्यात आली आणि मंत्रीपदावर पाणी सोडावे लागले आहे. अनेकांची पक्षातून हक्कालपट्टी झाली तर अनेकांची मंत्रीपद काढून घेण्यात आली. या यादीत आणखी एका मंत्र्याचा समावेश झाला आहे. हा नेता बरेच दिवस गायब होता. एका टीव्ही अँकर सोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे त्यांची मंत्रीपदावरुन हक्कालपट्टी करण्यात आली आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग यांना आपली खुर्ची सोडावी लागली आहे. रिपोर्टनुसार, किन गँगचे हाँगकाँगच्या टीव्ही अँकर फू झिया ओटियनसोबत अफेअर होते, जे त्यांना चांगलेच महागात पडले. झियाओटियन हिचा ब्रिटीश गुप्तचरांशी संबंध असल्याचा संशय आहे. नुकतीच तिने गँग यांची मुलाखत घेतली होती, जिथे संभाषणादरम्यान दोघांचे हावभाव थोडे वेगळे होते.
जगात एखाद्या नेत्याला अनैतिक संबंधामुळे खुर्ची गमवावी लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. दक्षिण कोरियाच्या अध्यक्षा पार्क ग्युन-ही यांना २०१६ मध्ये मोठ्या राजकीय उलथापालथीचा सामना करावा लागला.जेव्हा त्यांचे चोई सून-सिल यांच्याशी जवळचे संबंध समोर आले. चोई हे पार्कच्या निर्णयांवर अवाजवी प्रभाव टाकत असल्याचे आढळून आले, ज्यामुळे सार्वजनिक आक्रोश आणि व्यापक निषेध झाला. यानंतर पार्क यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला आणि त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले.
मलेशियाचे १९९८ मध्ये उपपंतप्रधान अन्वर इब्राहिम एका धक्कादायक प्रकरणात अडकले होते. सहकाऱ्यासोबत अफेअर असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. इब्राहिमला भ्रष्टाचार आणि अनैसर्गिक सेक्सच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले. तर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांच्यावर एका अमेरिकन नागरिकाशी लग्नानंतर अफेअर असल्याचा आरोप करण्यात आला होता. २०१८ मध्ये, यावरून वाद निर्माण झाला आणि आरोप नाकारूनही देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना त्यांच्या पदावरून अपात्र ठरवले.
नजीकच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त प्रकरणांपैकी एक म्हणजे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन आणि व्हाईट हाऊस इंटर्न मोनिका लेविन्स्की. हे प्रकरण १९९८ सालचे आहे. क्लिंटन यांच्यावर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने महाभियोग चालवला होता. जरी ते सिनेटच्या खटल्यातून वाचले आणि त्याचा कार्यकाळ पूर्ण केला तरी या घोटाळ्याने त्याचा वारसा कायमचा कलंकित केला.
न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर