मुंबई, दि. २९ जून २०२०: चीनशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार सुरू आहे. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अशा प्रकारच्या पत्राचा उल्लेख केला होता, ज्यात चिनी वस्तूंचा वापर न करण्याचा संकल्प घेण्याचे उल्लेख होते. आतापर्यंत चीनच्या मुद्यावर कॉंग्रेसला राजकारण करू नका असा सल्ला देणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोर्चेबांधणी केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्रातील उद्धव सरकारचे मंत्री जितेंद्र अहवाड यांनी भाजपवर टीका केली आणि ते म्हणाले की, आता स्वयंघोषित देशभक्त चिनी वस्तूंच्या बहिष्काराबद्दल बोलतात. त्यांनी असा आरोप केला की परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या मुलाच्या संस्थेत चीनकडून तीन कोटी रुपयांची देणगी आली आहे.
जितेंद्र आव्हाड एवढ्यावरच थांबले नाहीत. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांनाही कचाट्यात घेतले. त्यांनी अजित डोभाल यांच्यावर असा आरोप केला आहे की, डोभाल यांच्याशी संबंधित संस्था देखील चीनची संबंधित आहे आणि आता हे चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या गोष्टी करत आहेत.
१५ जून रोजी लडाखमध्ये झालेल्या हिंसक झटापटी नंतर देशामध्ये चीन विरोधात आक्रोश वाढत आहे. यातील एक गोष्ट म्हणजे देशभरातून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जात आहे आणि या सर्वांमध्ये आता भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकमेकांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करत आहे. या चिखलफेक मध्ये आता राष्ट्रवादी देखील सामील होताना दिसत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी











































