नवी दिल्ली, दि.७ जून २०२०: सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तरावर चीनचा बहिष्कार केला पाहिजे. आपली सेना देशाच्या सीमांचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. शस्त्रांपेक्षा चीनला पराभूत करण्यासाठी त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे, असं बाबा रामदेव म्हणाले आहे.
आजतकच्या ई-अजेंटा सुरक्षा सभा या कार्यक्रमात ते बोलत होते. कारण चीन आपल्या देशांत १५ ते २० लाख कोटींचा व्यवसाय करतो. टॉयलेट सीटपासून खेळण्यांपर्यंत चीनची उत्पादनं आपल्याकडे आयात केली जातात, असंही बाबा रामदेवांनी सांगितलं आहे.
चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासाठी मोठे ठराव करावे लागतील. मी गेल्या तीन दशकांत कोणतेही चिनी उत्पादन वापरलेले नाही. जर चीनला धडा शिकवायचा असेल तर प्रत्येक भारतीयाने चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा संकल्प केला पाहिजे. चीनला धडा शिकवण्याचा हा उत्तम मार्ग आहे, असेही बाबा रामदेव यांनी सांगितले आहे.
जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून ” हिंदी-चिनी भाई -भाईचा ” नारा दिला जात असून, चीन आपल्याला लुटत आहे. अशा परिस्थितीत केवळ चिनी उत्पादनांवर बहिष्कारच नाही, तर त्यांच्याविरोधात द्वेषाचे वातावरण देखील निर्माण करावे लागेल. असेही रामदेवबाबा यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: