चित्रपटसृष्टीचा थलाईवा ‘रजनीकांत’

चित्रपट सृष्टीतील एक मोठे आणि व्यक्तीमत्त्व आणि ख्यातनाम तमिळ आणि हिंदी चित्रपट अभिनेते रजनीकांत यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त जाणून घेऊ यात त्यांच्या जीवनातील तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी..

रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर१९५० ला बेंगळुरू येथे झाला. जिजाबाई आणि रामोजीराव यांच्या ४ मुलांमध्ये रजनीकांत सर्वात लहान होते. रजनीकांत ५ वर्षाचे असताना आईचे निधन झाले. आईच्या निधनानंतर घर चालविण्यासाठी त्यांनी कुलीचेही काम केले. रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. सुपरस्टार होण्यापूर्वी त्यांनी काही दिवस बस कंडक्टर म्हणून काम केलेले आहे.
अभिनेता बनण्याचे स्वप्न रजनीकांत यांना त्यांचे मित्र राज बहादूर यांच्याकडून मिळाले.
बालचंद्रच्या ‘अपूर्व रागनाल’ या चित्रपटाद्वारे रजनीकांतने तमिळ चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली.
अभिनयाची सुरूवात त्यांनी कन्नड नाटकांमधून केली. तर दुर्योधनच्या भूमिकेत रजनीकांत खूप लोकप्रिय झाले.
बर्‍याच नकारात्मक भूमिकांमध्ये अभिनय केल्यानंतर रजनीकांत प्रथम एसपी मुथुरामन यांच्या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसले.
रजनीकांत यांना ‘बिल्ला’ या चित्रपटातून पहिले व्यावसायिक यश मिळाले. १९७८ मध्ये हा चित्रपट अमिताभ बच्चन अभिनीत डॉन बिल्लाचा रिमेक होता.
रजनीकांत यांनी प्रथमच ‘मुंदरू मुगम’ मध्ये तिहेरी भूमिका साकारली. यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
टी रामारावचा ‘अंधा कानुन’ हा चित्रपट रजनीकांतचा पहिला हिंदी चित्रपट होता.
रजनीकांत यांनी १९८५ मध्ये १०० चित्रपट पूर्ण केले. श्री राघवेंद्र हा रजनीकांत यांचा १०० वा चित्रपट होता, आणि त्यांनी हिंदू संत राघवेंद्र स्वामी यांची भूमिका केली होती.
दरम्यान तमिळनाडूच्या आगामी विधानसभा निवडणुकांपासून राजकीय कारकिर्दीस प्रारंभ करणार असल्याची घोषणा रजनीकांत यांनी केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा