पुणे, दि. २४ जून २०२० : कोरोना महामारीच्या या संकट काळात २४ तास सज्ज राहून देशाची सेवा करणाऱ्या पोलीस बांधवांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असली तरी पोलीस मात्र दिवसरात्र कार्यरत आहेत आणि त्यांच्या या कृतज्ञतेची जाणीव ठेवत अभाविपने त्यांना गिफ्ट देऊन आभार व्यक्त करण्याचा प्रयत्न केला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी काल दिनांक २३ जून तसेच आज दिनांक २४ जून या दोन दिवसांत पुणे शहरातील विविध भागातील पोलीस बांधव आणि भगिनींना भेटून त्यांना आभार स्वरूपी चॉकलेटचे किट दिले. अशा प्रकारे पुणे शहरातील नागरिक व विद्यार्थी यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्याचा असा छोटासा प्रयत्न करण्यात आला.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड