तापी नदीवरील मातीचा पुल अवकाळी पावसामुळे वाहून गेल्याने चोपडा -खेडी भोकरी -जळगाव रस्ता बंद

चोपडा, जळगाव ५ डिसेंबर २०२३ : जळगाव जाण्यासाठी सोईचा ठरणारा खेडी भोकरी गावा जवळील तापी नदीच्या पात्रात तात्पुरता स्वरूपाचा बांधण्यात आलेल्या मातीचा पुल हा नुकताच पडलेल्या अवकाळी पावसाच्या प्रवाहामुळे वाहून गेल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक हि तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

जळगावच्या चोपडा तालुक्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी धरणगाव मार्गाने साठ किलोमिटर अंतर पडते. दुसरा मार्ग धानोरा गावाकडून गेले तर पंच्चावन्न किलोमीटर अंतर येते. तर खेडी भोकरी मार्गे पंच्चेचाळीस किलोमीटरचे अंतर येते म्हणून चोपडा तालुक्यातील नागरिक हे बहुतांश या मार्गाचा अवलंब करतात. परंतू या मार्गावर तापी नदीवर सध्या पुलाचे बांधकाम सुरू असुन नागरिकांसाठी तात्पुरता मातीचा पुल बांधण्यात आला होता. परंतु अवकाळी पावसामुळे मातीच्या पुलाचा भराव हा वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील रहदारी हि थांबण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : आत्माराम पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा