गोल पोस्ट राष्ट्रीय चोरट्यांचा साडेतीन लाखांच्या कांद्यावर डल्ला

चोरट्यांचा साडेतीन लाखांच्या कांद्यावर डल्ला

नवी दिल्ली : रोकड आणि सोनं लुटून चोरांनी पोबारा केल्याच्या घटना आतापर्यंत आपण पाहिल्या आहेत. पण आता कांद्यांचीही चोरी होऊ लागली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बिहारमध्ये एका कारमधून प्रवास करणाऱ्या सहा जणांनी कांद्याने भरलेला ट्रक अडवला. त्यानंतर ट्रक चालकाला बंदुकीचा धाक दाखवून चोरांनी ट्रक ताब्यात घेऊन पोबारा केला.
ट्रकमधील तब्बल ३.५ लाख रुपये किमतीचा जवळपास ५ टन कांदा लुटून चोरांनी पोबारा केला.
ट्रक चालकानं पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती देत तक्रारीची नोंद केली. पोलिस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version