CIAने अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला ड्रोन हल्ल्यात केले ठार

यूएस, २ ऑगस्ट २०२२: अल-कायदा प्रमुख अयमान अल-जवाहिरी हा अमेरिकेच्या केंद्रीय गुप्तचर संस्थेने (सीआयए) अफगाणिस्तानमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार केला आहे. अमेरिकन अधिकार्‍यांनी सोमवारी रॉयटर्सला सांगितले की दहशतवादी गटाचा संस्थापक ओसामा बिन लादेनच्या २०११ च्या हत्येनंतर सर्वात मोठा धक्का बसला आहे.

इजिप्शियन डॉक्टर आणि सर्जन जवाहिरीने ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत झालेल्या हल्ल्यात चार विमाने अपहरण करण्यात मदत केली होती. यामध्ये २ विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या (WTC) दोन्ही टॉवरवर आदळली. तर तिसरे विमान अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणजेच पेंटागॉनला धडकले. चौथे विमान शँकविले येथील शेतात कोसळले. या घटनेत ३ हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

अमेरिकेतील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर रविवारी सांगितले की, सीआयएने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये ड्रोन हल्ला केला. प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले- अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये अल-कायदाविरोधात दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई पूर्णत: यशस्वी झाली असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जवाहिरीच्या हत्येनंतर ऑगस्ट २०२१ मध्ये काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने दहशतवादी नेत्याला आश्रय दिला होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याआधी गेल्या २० वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्य तैनात आहे. तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी एका निवेदनात या हल्ल्याची पुष्टी केली आणि या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि ते “आंतरराष्ट्रीय तत्त्वांचे” उल्लंघन असल्याचे म्हटले.

रविवारी पहाटे काबूलमध्ये मोठा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नफी ताकोर यांनी आधी सांगितले: “शेरपूरमधील एका घराला रॉकेटने धडक दिली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे घर रिकामे होते. तालिबानच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, त्या दिवशी सकाळी काबूलवर ड्रोन उडत असल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या ऑपरेशनबाबत माहिती देऊ शकतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा