मुंबई ४ नोव्हेंबर २०२०: महाराष्ट्र सरकारनं आता अनलॉक संदर्भात नवी नियमावली जाहीर केली आहे.त्यामध्ये नाट्यगृहं, सिनेमागृहं, मल्टिप्लेक्सेस ला ५० टक्के क्षमतेनं सुरू करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. मात्र नाट्यगृहं, सिनेमागृहं, मल्टिप्लेक्सेस खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसेल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून देण्यात आलेले सर्व नियम पाळणं नागरिकांना बंधनकारक असेल.
गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील
चित्रपटगृहं,नाट्यगृहं,मल्टिप्लेक्स बंद आहेत.त्यामुळे या क्षेत्राचं प्रचंड मोठं नुकसान झालं फिजिकल डिस्टन्सिंगसह अन्य नियम पाळून जर मॉल ,हॉटेल व्यवसायांना परवानगी दिली आहे.मग चित्रपटगृहं, नाट्यगृहं, मल्टिप्लेक्सेस सुरू करण्यास काय अडचण आहे.अशी मागणी या क्षेत्रामधून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती.आज अखेर राज्य सरकारनं हा निर्णय घेऊन मनोरंजन क्षेत्राला एक प्रकारे दिलासा दिला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव