बारामती: बारामती शहरातील पुण्यातून आलेल्या विद्यार्थ्याने त्याला कोरोना संसर्गाच्या धर्तीवर होणाऱ्या त्रासाची तपासणी करायला गेल्यावर तेथील कर्मचारी त्याच्या कडे बघून हसायला लागल्याची व त्यालाच तुला कोणी सांगितले कोरोनाचे टेस्ट होते असे प्रश्न विचारायाल लागले अशी खंत एका विद्यार्थ्याने केली.
देशात कोरोना व्हायरस बाबतीत जनजागृती करून तसे वेगवेगळ्या खबरदारी घेतली जाते आहे. मात्र पुण्यात शिकणारा विद्यार्थी कोरोना व्हायरस चे पुण्यात संशयित असल्याचे वृत्तपत्रात वाचुन हा विद्यार्थी बारामती जवळ असणाऱ्या त्याच्या घरी आला. त्याला ताप, सर्दी व खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याने काल रुई येथील सरकारी रुग्णालयात तो व त्याची बहीण जाऊन कोरोना टेस्ट करायची आहे. असे तेथील नर्सला सांगितल्यावर त्या नर्सने उलट त्यांनाच कोरोना व्हारासाची टेस्ट होते हे तुम्हला कोणी सांगितले असा सवाल केल्यावर ते तिथून निघुन आले.
आज त्यांनी बारामती शहरातील सिल्व्हर जुबालि हॉस्पिटलमध्ये गेले असता त्यांना केस पेपर काढल्यावर तिथे खूप वेळ बसावे लागले तसेच तपासणी साठी डॉक्टरनकडे गेल्यावर विद्यार्थ्याने मी पुण्यावरून आलो असून मला ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास होतो आहे. असे ते त्यांना सांगितल्यावर ते माझ्याकडे बघून हसायला लागले. अशी खंत या १८ वर्षाच्या विद्यार्थ्याने केली आहे. यावेळी त्याच्या बरोबर त्याची बहीण देखील होती. पुण्यात कोरोना व्हायरस संसर्ग संशयित पेशंट संख्या जास्त असल्याने सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांनी या कोरोना संसर्गाचा दुष्परिणाम लक्षात घेऊन त्याची योग्य विचारपुस करणे गरजेचे आहे. मात्र या गंभीर प्रसंगी जर रुग्णांना अशा पद्धतीने वागणूक मिळणार असेल तर संशयित रुग्ण हॉस्पिटलमध्ये कसे येणार असा सवाल केला जातो आहे.