सहा दुय्यम निबंधक कार्यालयात दिवसभर वीज नसल्याने नागरिकांना मनस्ताप

बारामती, २१ जानेवारी २०२१: बारामतीतील प्रशासन भवन येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात रोज खरेदी विक्रीसाठी नागरिकांची गर्दी असते. गुरुवार (दि.२१) सकाळी १० वाजल्यापासून शहरात वीज नव्हती. दुय्यम निबंधक कार्यालयात जनरेटर किंवा इन्व्हर्टरची सोय नसल्याने सगळे कामकाज ठप्प झाले. परिणामी कामासाठी आलेल्या नागरिकांना दिवसभर मनस्ताप सहन करावा लागला.

बारामती शहरातील विद्युत पुरवठा आज सकाळी दहा वाजल्यापासून खंडित होता. प्रशासन भवनातील सहा दुय्यम निबंधक कार्यालयातील व्यवहार देखील सकाळ पासुन बंद होते. तर येथे असणाऱ्या दोन्ही कार्यालयात विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर जनरेटर किंवा बॅटरी बॅकपची कोणतीही सोय नसल्याने कामासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांना वीज येण्याची प्रतीक्षा करावी लागली.

दोन्ही कार्यालयात मिळुन दुपारी बारा वाजेपर्यंत साधारण ५० दस्तांची नोंद झाली होती. अनेक लोक बाहेरगावाहून येत असल्याने कार्यालयाच्या आवारात नागरिकांची गर्दी झाली होती. सध्या कोरोना संसर्गाच्या धर्तीवर येथे कोणताही सोशल डिस्टन्स, मास्क किंवा सॅनिटायजर वापरत नसल्याचे येथील काही नागरिकांनी सांगितले.

तर कोरोना सांसर्गाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर बाहेरगावतील लोकांना परत उद्या हेलपाटा मारावा लागणार आहे.तर मागील एक वर्षापासून बॅटरी खराब झाली आहे. याबाबत सह जिल्हा निबंधक वर्ग १ यांच्याकडे बॅटरीची मागणी केली आहे. त्या कार्यालयाने तशी शिफारस वरिष्ठ कार्यालयाकडे केली असल्याचे येथील अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तर १ नंबर कार्यालयातील अधिकारी उपस्थित न्हवते याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना मोबाईलवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा