सरकारच्या वैद्यकीय आर्थिक सवलतींविषयी नागरिकांना येत आहेत समस्या

माझं नाव अश्विनी बिपिन जाधव, माझे पती राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक २ पुणे येथे कार्यरत आहेत कर्तव्यावर असताना त्यांना कोविडची लागण झाल्याने दिनांक ३/५/२०२० रोजी नोबल हॉस्पिटल पुणे येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर घरामध्ये सोबत राहणा-याची
तपासणी केली असता माझे सासरे, नणंद व तिची मुलगी यांना कोविडची लागण झाल्याने दिनांक ६/५/२०२० पासून वरील नमूद नोबल हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलेले आहे.

आज दिनांक १८/५/२०२० रोजी मी माझ्यावरील कुटुंबियांच्या वैद्यकीय बिलाची चौकशी केली असता वरील प्रत्येकाचे वैद्यकीय बिल अनुक्रमे अंदाजे ४,१०,०००/-, ३,३५,०००/-, ३,९३,०००/-,१,१३,०००/- अशा पद्धतीने बिल आकारण्यात आलेले आहे. अजूनही त्यांचे उपचार पुढे चालू आहेत आणि आणखी किती बिल पुढे वाढणार आहे कोणास ठाऊक.

आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे साहेबांनी प्रसार माध्यमांमध्ये जाहिर केलेल्या सुविधांबाबत हॉस्पिटल कडे चौकशी केली असता महात्मा ज्योतिबा फुले हेल्थ इन्शुरन्स स्कीम आमच्याकडे लागू नाही असे समजले आले. टोपे साहेबांनी सांगितल्या प्रमाणे या हॉस्पिटल कडून शासनाने नियोजित केलेल्या दरा प्रमाणे बिल तर नक्कीच अाकारलेले नाही. तसेच याबाबत मी रुग्ण हक्क परिषदेचे सचिन सर यांना देखील फोन केला होता त्यांचे कडून मला अशी माहिती मिळाली आहे की सचिन सर स्वतः मा. उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री टोपे साहेब यांचेशी बोलले आहेत. या विषयावर सचिन सरांनी त्यांना सांगितले आहे की तुम्ही प्रसार माध्यमांवर बोलल्याल्या सवलती किंवा वैद्यकीय दरांबाबत जो पर्यंत काही अध्यादेश काढत नाहीत तो पर्यंत या सवलती किंवा सेवांचा लाभ जनतेला घेता येणार नाही. तरी आपण यावर काहीतरी अध्यादेश परित करावा. परंतू यावर प्रशासनाकडून अद्याप कोणताही अध्यादेश पारीत करण्यात आलेला नाही.

आता एवढी मोठी रक्कम कशी आणि कोठून भरणार असा प्रश्न माझ्या समोर आहे. याबाबतीत मुख्यमंत्री किंवा आरोग्य मंत्री यांनी माझी काही तरी मदत करावी अशी माझी अपेक्षा आहे आणि फक्त माझीच नाही तर समाजामध्ये माझ्यासारखे अनेक परिवार असतील ज्यांच्या वर आज ही वेळ आलेली आहे, त्यांनाही शासनाच्या या सवलतींचा किंवा मदतीचा फायदा मिळालाच पाहिजे असं मला वाटते आहे.

अश्विनी बिपिन जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा