बारामती शहरातील मोरगाव रस्त्यावरील नागरिक हवालदील

बारामती, २५ डिसेंबर २०२०: बारामती पुणे रस्त्यावर सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणा मध्ये मेदड गावापासून रस्त्याच्या कडेला गेली ५० वर्षांपासून लोक राहत आहेत. शासनाकडून येथील रहिवाश्यांना कोणतीही पूर्व कल्पना दिली गेलेली नाही तर येथील रस्तारुंदीकरणात अनेक व्यावसायिक देखील रस्त्यावर येणार आहेत.
   पुणे-बारामती रस्त्याने शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मेदड गाव ते बारामती पर्यंत धावजीबुवा मंदिरापासून रस्त्याच्या कडेला साधारण ५० घरे असून साधारण दोनशे रहिवाशी रस्त्यावर येणार आहेत. हे नागरिक मागील पन्नास वर्षांपासून जास्त काळ येथे वास्तव्य करत आहेत.
    येथील रहिवासी हे रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह करणारे असुन त्यांची दुसरीकडे कोठे राहण्याची व्यवस्था नाही हे सगळे प्रपंच रस्त्यावर येणार असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. या रहिवाश्यांच्या घरावर ठेकेदाराने मार्किंग केले आहे. मात्र, ‘शासनाकडून कोणतीही नोटीस किंवा ठेकेदाराने आम्हाला कोणतीही पूर्व कल्पना दिलेली नाही. अचानक जेसीबी मशीन आणून काम सुरू करत आहेत. तर मशीनने केलेल्या खड्यांमुळे रस्त्या खालच्या मोठ्या वायर वर आल्या आहेत तर अनेक ठिकाणी त्या मशीनमुळे तुटल्या आहेत. यामुळे मोठा अपघात होऊ शकतो’ असे येथील रहिवाश्यांनी सांगितले.
    येथील ७० वर्षीय महिला म्हणाल्या ‘मी या घरात लग्न होऊन आले होते. आधी माझ्या अंगावर मशीन घाला माजी मुलं रोजंदारीवर कामावर जातात.’ तर काही तरुण म्हणाले या रस्त्यावरील ठेकेदार पूर्व कल्पना देत नाहीत. कोण काय करतंय ते कळत नाहीत. या रस्ता रुंदीकरणात मोठी वृक्षतोड देखील झाली आहे.
     येथील रहिवाशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ज्यांची घरे पडणार आहेत त्यांची पर्यायी व्यवस्था व्हावी याविषयी भेटले असताना पवार यांनी त्यांना पर्यायी व्यवस्था होईल असे सांगितले होते. मात्र रस्त्याचा ठेकेदार कोणतीही पूर्व कल्पना न देता मशीन घेऊन काम सुरू करत आहे असे नागरिकांनी हताश पणे सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा