बारामती, १२ ऑक्टोबर २०२०: बारामती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण याप्रमाणे बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी उर्फ नाना होळकर हे संपूर्ण तालुक्यात पावसाची परिस्थिती किती मिलीमीटर पाऊस झाला हे तालुक्यातील नागरिकांना महितीसाठी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व पत्रकारांना नियमाने माहिती देत असतात.
राजकारणात काम करत असलेले नाना होळकर यांचा नेहमी सामाजिक कार्याकडे ओढा असतो. सामाजिक बांधीलकी जपत ते न चुकता पावसाळ्यात तालुक्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी देण्यात पुढे असतात. ही माहिती म्हणजे पक्षाचे काम, राजकारण नव्हे बरं का, सामाजिक उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्वांपर्यंत माहिती कशी पोहचेल हा त्यांचा मनोमन उद्देश असतो. त्यांनी आजपर्यंत म्हणजे दि.१२ ऑक्टोबर सकाळी ८ वाजेपर्यंत व दि.1 जुन आजपर्यंत एकुण पडलेल्या पर्जन्यमानाची सविस्तर आकडेवारी जाहीर केली आहे.
बारामती तालुक्यात एकुण पडलेल्या पर्जन्यमानाची सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे:
1) बारामती-35 मि.मि एकूण-735
2) उंडवडी क.प-12 मि.मि एकूण-452
3) सुपे-06 मि.मि एकूण-665
4) लोणी भापकर-13 मि.मि एकूण-731
5) माळेगांव कॉलनी-26 मि.मि एकूण-657
6) वडगांव निं-19 मि.मि एकूण-919
7) पणदरे-20 मि.मि एकूण-694,
8) मोरगांव-06 मि.मि एकूण-641
9) लाटे-14.20 मि.मि एकूण-711.2
10) बर्हाणपूर-17 मि.मि एकूण-681
11) सोमेश्वर कारखाना-8.4 मि.मि एकूण-921.1
12) जळगांव क.प-17 मि.मि एकूण-882
13) होळ 8 फाटा-10.5 मि.मि एकूण- 755.2
14) माळेगांव कारखाना-15 मि.मि एकूण-475
15) मानाजीनगर- 20 मि.मि एकूण-707
16) चांदगुडेवाडी-02 मि.मि एकूण-910
17) काटेवाडी-26 मि.मि एकूण-81.5
18) अंजनगाव-14 मि.मि एकूण-645.5
19) सोनवडी सुपे-05 मि.मि एकूण-636
20) जळगांव सुपे-15 मि.मि एकूण-790
21) के.व्ही.के-22.2 मि.मि एकूण-604.6
22) सोनगाव-24.1 मि.मि एकूण-785
23) कटफळ-19 मि.मि एकूण-734
24) सायंबाचीवाडी-15 मि.मि
25) चौधरवाडी-5 मि.मि एकूण-407.7
26) नारोळी-02 मि.मि एकूण-544
27) कार्हाटी-5.4 मि.मि एकूण-543.4
28) गाडीखेल-25 मि.मि एकूण-766.5
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव