दसऱ्यानिमित्त सोने खरेदीसाठी नागरिकांची उशिरा पर्यंत गर्दी

पुणे, ६ ऑक्टोबर २०२२ : दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी सोने खरेदी शुभ मानले जाते. साडेतीन मुहूर्तावर सोने खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी गर्दी केली होती.

विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर भल्या सकाळपासून झेंडू आणि आंब्याची पाने, पूजेचे साहित्य, सोनं (आपटा), कपडे, वाहन, सदनिका खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत होता. पुणे शहरासह उपनगरांमध्ये बाजारपेठ सायंकाळी नागरिकांची गर्दी ओसरल्याचे चित्र होते, परंतु सोन्याच्या पेढ्यांमध्ये चिमुकल्यांना घेऊन महिला-भगिनींची रात्री उशिरा पर्यंत मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, दसऱ्याच्या मुहूर्तावर परतीच्या पावसाने दुपारच्या सुमारास हजेरी लावली. त्यामुळे फुलविक्रेत्यांची तारांबळ उडाली. सायंकाळी पाच वाजल्यानंतर फुलबाजार ओस पडला होता. सायंकाळी ठीक ठिकाणी नागरिकांनी सीमोल्लंघनासाठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा