नवी दिल्ली: देशातील वाढती लोकसंख्या व सरकारच्या नियमांमुळे व काही निर्णयांमुळे कंपन्यांवर ओढवलेले संकट यामुळे बेरोजगारीचा दर वाढत चालला आहे. बेरोजगारीचा प्रश्न हा आधीपासून होताच परंतु सरकारच्या धोरणामुळे आणि ओढवलेल्या आर्थिक मंदीमुळे बेरोजगारीची तीव्रता आणखी जास्त जाणवत आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सरकारने आपल्या धोरणांमध्ये केलेल्या बदलांमुळे बेरोजगारी दर या तिमाहीत घटल्याचे आढळून आले आहे.
देशातील शहरी बेरोजगारीच्या दरात जानेवारी ते मार्च २०१९ या तिमाहीत घट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तो आता ९.३ टक्क्यांवर आला असून गेल्या चार तिमाहीतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. तर गेल्या तिमाहीत हा दर ९.९ टक्के होता केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ही आकडेवारी समोर आली आहे. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जानेवारी ते मार्च २०१९ या कालावधीसाठी प्रसिद्ध झालेल्या अहवालात शहरी भागातील रोजगार संबंधीच्या विविध घटकांची माहिती देण्यात आली आहे. या कालावधीत महिलांसाठी चा बेरोजगारीचा दर ११.६ टक्के इतका होता.