जम्मू-काश्मीर, १९ नोव्हेंबर २०२०: जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांविरूद्ध सुरक्षा दलाचे ऑपरेशन सुरू आहे. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनंतर नागरोटा येथे सुरक्षा अधिक कडक केली गेली. आहे त्याचप्रमाणे नाक्यावर येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी सुरू करण्यात आलीय. दरम्यान सुरक्षा दलांनी बान टोल प्लाझाजवळ नाकेबंदी केली आहे.
वाहनांच्या तपासणी दरम्यान दहशतवाद्यांच्या गटानं पहाटे पाच वाजता सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. गोळीबारानंतर दहशतवादी जंगलाकडं धावू लागले. यानंतर चकमक सुरू झाली. या चकमकीत ४ अतिरेकी ठार झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. चकमकीमुळं जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे.
या चकमकीत सैन्याचा एक जवान जखमी झाला आहे. जखमी झाल्यानंतर कुलदीप राज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तेथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
असे मानले जाते की जम्मू-श्रीनगर महामार्गावरून ३-४ दहशतवादी ट्रकद्वारे काश्मीरला जाण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेराव घातला आणि मग चकमकीला सुरुवात झाली. या घटनेमुळं जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगतच्या नगररोटा येथे सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे