श्रीनगर परिसरात जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक

5

नवी दिल्ली (वृत्त संस्था), दि.१९ मे २०२०: जम्मू-काश्मीर येथे सोमवारी( दि.१८) रात्री उशिरा दहशतवाद्यांशी चकमक झाली. श्रीनगर भागांमधील नवाकदल या भागात अतिरेकी आणि सुरक्षा दलामध्ये ही चकमक झाली असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर श्रीनगरमधील मोबाइल इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.

या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार जवानांनी या दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर सुरक्षा दल आणि पोलिसांनी मिळून येथे गोळीबार केला. याबाबत मिळालेल्या माहितीवरून या आगोदर रविवारी देखील या परिसरात हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ताहीर अहमद भट ला येथे ठार करण्यात आले होते. याबाबत जम्मू काश्मीर पोलिसांनी ट्विट करत या चकमकीच्या बातमीला दुजोरा दिला आहे. जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे जवान नवाकदल मधील कनेमझार या भागातील असल्याचे बोलले जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा