भोकरदन, २२ फेब्रुवारी २०२४ : कालपासून संपूर्ण महाराष्ट्रात १२ वी च्या परिक्षेला सुरुवात झाली असून परीक्षा केंद्रावर इंग्रजी विषयाचा पहिला पेपर सुरुळीत पार पडला. भोकरदन तालुक्यात एकूण २० परीक्षा केंद्रावर परीक्षा होत असून एकूण ९ हजार ८२९ परीक्षार्थी परीक्षेत बसलेले आहेत. भोकरदन शिक्षण विभागाच्या वतीने कृषि विभाग, शिक्षण विभाग, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची परीक्षा केंद्रावर भरारी बैठे पथके तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलिस निरिक्षक बालाजी वैद्य यांनी परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे












































