कंत्राटी पद्धत बंद करा: भोसले

पुणे, दि.३ जून २०२०: राज्यातील सर्व उद्योग पूर्ववत सुरु झाले आहेत. मुळच्या ठेकेदारांचे कामगार निघून गेले आहेत. यामुळे शासनाने आता तरी ठेकेदारी पद्धत बंद करावी, अशी आग्रही मागणी तसेच राज्यातील विद्यार्थी व युवकांनी कायम नोकरीचाच आग्रह धरावा, असे आवाहन राष्ट्रीय श्रमीक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष व राज्याचे कामगार नेते यशवंत भोसले यांनी केले आहे.

भोसले यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यभरातील कामगारांशी जनसंवाद साधला. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बंद झालेले उद्योग शासनाने पून्हा सुरु करण्याची परवानगी दिली असल्याने वॉट्स अ‍ॅपवर, विविध ग्रुपवर तसेच सोशल मिडीयावर महाराष्ट्रीयन तरुणांना सुवर्ण संधी, कष्ट करा, घाम गाळा अशा भावनिक आवाहन करणार्‍या जाहिराती येवू लागल्या आहेत.  या जाहिराती ठेकेदारांच्या आहेत. तुम्हाला नोकरी पाहिजे आहे तर थेट कंपनीत अर्ज करा. सर्व सुविधा व परमनंट नोकरीचाच हट्ट धरा असे आवाहन यशवंत भोसले यांनी युवकांना केले आहे.

आपणही शासनाला विनंती करीत आहोत, आता तरी ठेकेदारी पद्धत बंद करा. आता भुमीपुत्रांना न्याय द्या अशी मागणीही यशवंत भोसले यांनी या संवादाच्या माध्यमातून केली आहे.

यावेळी भोसले म्हणाले की, शासन  परदेशी उद्योजकांना पायघड्या घालायला निघाले आहेत. जमीन, वीज देण्यास तयार आहे पण या जमीनी कोणाच्या आहेत? असा प्रश्‍न विचारत, शासनाने जे भुमीपुत्र उद्योजक बनण्यास तयार आहेत, त्यांना संधी दिली पाहिजे अशी मागणी केली आहे.  एका अहिंसात्मक युद्धाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असे आवाहनही यावेळी त्यांनी तरुण वर्गाला केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा