गारआकोले येथे ढगफुटी, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

माढा (सोलापूर), दि. १५ जुलै २०२०: माढा तालुक्यातील टेंभुर्णी जवळ असलेल्या कोंढारभागातील गारआकोले येथे प्रचंड प्रमाणावर आतापर्यतच्या इतिहासात पहिल्यांदाच अतिवृष्टी होऊन ढगफुटी झाल्याने सर्वत्र महापुरा सारखी परिस्थिती निर्माण झाली असून आक्षरश: कोंढारभागातील रस्ते नाले पाण्याने भरून वाहिल्याने रस्ते खचून गेले असून गारअकोलेच्या आज पर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी ढगफुटी झाली असून या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे अतिशय मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

जवळजवळ ९० ते ९५ मिलिमीटर पाऊस या ठिकाणी पडला असल्याचे चित्र आहे. परंतु सगळ्यात महत्वाचे म्हणजे या गावातील सर्वच रस्त्यांवर नदीसारखी अवस्था निर्माण झाली होती. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या निकृष्ट कामांमुळे एकही रस्ता नीट राहिला नाही. लोकांची मोठ्या प्रमाणावर कोंडी निर्माण झाली आहे.

या भागातील शेतकऱ्यांचे ऊस केळी डाळिंब यासह सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अद्याप सर्वत्र पाणी वाहत असून उद्या दिवसभर असेच रस्त्यांवर नाल्यातून पाण्याचा महापूर आल्याचे चित्र या भागात पाहायला मिळत आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांची पहाणी करुन पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा