नवी दिल्ली, 7 एप्रिल 2022: जनतेला गुरुवारी पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. आज सीएनजीच्या दरात किलोमागे तीन रुपयांनी वाढ झाली आहे. एका आठवड्यात आतापर्यंत सीएनजीवर 9.60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
यापूर्वी सीएनजीच्या दरात आदल्या दिवशी प्रतिकिलो 2.50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानुसार आजची वाढ अलीकडच्या काळात सर्वाधिक आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे