रक्तदान शिबीराचे आयोजन करत ५० रक्त पिशवींचं संकलन

पिंपरी चिंचवड, ३१ ऑगस्ट २०२०: कै. किसन सुखदेव नांगरे (मा. पोलीस निरीक्षक) यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, गणेशभक्तानी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या वर्षी रक्तदानाचे ४ थे वर्ष असून, मास्क व सँनिटायजर चे वाटप करण्यात आले होते.

आपल्या देशावर तसेच राज्यावर आलेले हे कोरोनाचे महाभयंकर संकट आणि मधल्या काळामध्ये जवळपास मागील पाच महिन्यांपासून असलेले लॉकडाऊन या कारणामुळे पिंपरी चिंचवड शहरांमध्येच नव्हे तर अगदी देशांमध्येसुद्धा रक्ताचा तुटवडा जाणवत होता. हीच बाब लक्षात घेऊन, समाजिक बांधिलकी म्हणून सुवर्णयुग मित्र मंडळ यांच्या संकल्पनेतून शिवस्पर्श ग्रुप, ताथवडे  यांच्यातर्फे रक्तदान शिबीर आयोजित केले होते.

सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करून, सोशल डिस्टन्स पाळून जवळपास ५० रक्त पिशवींच संकलन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून शिवस्पर्श ग्रुप ताथवडे हा गणेशोत्सवामध्ये अनेक विविध प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबवत असतो. रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, अन्नदान तसेच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आणि मंडळाचा सक्रिय सहभाग असतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा