यवतमाळात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

यवतमाळ, २९ सप्टेंबर २०२० : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु असतानाच यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध जिल्हा परिषद आरोग्य विभागातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आरोग्य विभागाची अवहेलना करुन अपमानास्पद वागणूक देतात, अशा स्वरूपाचे आरोप करत ८९ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत.

जे वैद्यकीय अधिकारी कोरोनाबाधित झाले आहेत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय महाविद्यालयात बेड उपलब्ध करून द्यावेत तसेच आठवड्यातून एक दिवसाची रजा आदी मागण्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा