नवी दिल्ली, ११ ऑगस्ट २०२२: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना एम्समध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलंय. प्रकृती चिंताजनक झाल्यावर त्यांना प्रथम इमर्जन्सी मेडिसिन विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं. नंतर CCU (कार्डियाक केअर युनिट) मध्ये दाखल केलं.
रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफी करण्यात आली असून त्यात मोठ्या प्रमाणात १०० टक्के ब्लॉक आढळले आहेत. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
एम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमर्जन्सी मेडिसिन विभागातील डॉक्टरांच्या पथकाने त्यांना बरं केलं. यानंतर त्यांना कार्डियाक केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
५८ वर्षीय राजू श्रीवास्तव यांना ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आला. अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि ते खाली पडले. यानंतर राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या जिम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात नेलं.
राजू यांचे पीआरओ अजित सांगतात की, कॉमेडियन पक्षाच्या काही बड्या नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. सकाळी जिमला गेले, जिम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांचे चाहते प्रचंड तणावाखाली आले आहेत. तसेच ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे