दिलासादायक; स्वाईन फ्लूच्या रुग्णांचे प्रमाण २५-३० टक्क्यांनी कमी

8

पुणे, ३ सप्टेंबर २०२२: जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोरोना आटोक्यात आला; मात्र स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढले. गेल्या तीन वर्षात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण या दोन महिन्यांमध्ये आढळून आले.

मात्र, आता पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील एक आठवड्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांचे प्रमाण २५ ते ३० टक्यांनी कमी झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पुण्यात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले, स्वाईन फ्लू, डेंग्यू , चिकुनगुनिया अशा आजारांचा संसर्ग वाढला. स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली.

त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे आणि कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमध्ये ८७९६ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामधे ७४९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले, तर महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूच्या २० रुग्णांचा मृत्यू झाला.

सहव्याधिंनी काळजी घ्यावी…..

कोरोना नियंत्रणात आल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. लहान मुले, जेष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांची अधिक काळजी घ्यावी, असे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा