पुणे, १४ नोव्हेंबर २०२२: नवी दिल्ली येथील अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या ७१ व्या अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर स्पर्धांचं आयोजन पुण्यात करण्यात आलंय. हडपसर रामटेकडी येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या क्रीडासंकुलात आयोजन करण्यात आलंय.
यंदाच्या स्पर्धांचा मान पाच वर्षानंतर पुण्याला मिळाला असून या स्पर्धांचा प्रारंभ झालाय. या मध्ये कुस्ती, कबड्डी, मुष्टीयुद्ध, पॉवरलिफ्टिंग आणि शरीरसौष्ठव आदी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. स्पर्धांमध्ये २७ राज्ये पाच केंद्रीय सशस्त्र पोलीस विभागाचे संघ, पाच केंद्रशासित प्रदेशांचे संघ असे एकूण ३७ संघ सहभागी होणार आहेत. या मध्ये १५९६ पुरुष आणि ६३२ महिला खेलाडू, प्रशिक्षक व सहायक असे एकूण दोन हजार ६३९ स्पर्धक सहभागी होणार आहेत.
राज्य राखीव पोलीस दलाचे पुणे परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक दीपक साकोरे यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. या स्पर्धत विविध राज्यातील तसेच केंद्रीय पोलीस दलातील अर्जुन पुरस्कार प्राप्त हिंद केसरी, महाराष्ट केसरी सहभागी होणार आहेत. यामध्ये गौरव सिंग, राहुल आवारे, नरसिंह यादव, विजय चौधरी, नवीन मोर या आधिकाऱ्यांचा समावेश आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर