टेंभुर्णी शहरातील ओढ्यातील झाडे-झुडपे व गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ

सोलापूर, दि. २६ जून २०२० : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी शहराचा पावसाळ्यापुर्वी संपूर्ण ओढा पावसाळ्याच्या तोंडावर स्वच्छ करण्यात आला. या कामाचा शुभारंभ शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कैलास सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सरपंच प्रमोद कुटे, उपसरपंच धनंजय गोंदिल, वैभव कुटे, मधुकर देशमुख, जयवंत पोळ, गणेश केचे, राजेंद्र कोठारी, तानाजी येवले-पाटील, डॉ. सोमनाथ साळुंके, हरिभाऊ सटाले, शेखर जाधव, शैलेश ओहोळ, संदीप लोंढे, नामदेव धोत्रे, यशपाल लोंढे, प्रशांत देशमुख यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, मान्यवर उपस्थित होते.

संपुर्ण बाजारतळ ते हायवे पर्यंत ओढ्यातील गाळ, झाडेझुडपे पोकलेन मशीनच्या साहाय्याने काढून संपूर्ण स्वच्छता करण्यात येणार असल्याचे सरपंच प्रमोद कुटे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा