काष्टी , दि. १० मे २०२०: देशभरातील ताळेबंदमुळे सर्व शाळा काॅलेज बंद करण्यात आले आहेत. देशभारातील विद्यार्थी वर्ग हा जास्त आहे , काॅलेज मधील राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमामार्फत अनेक ठिकाणी विद्यार्थी वर्ग काम करत आहे.
परिक्रमा शैक्षणिक संकुलातील परिक्रमा कॉलेज ऑफ फार्मसी काष्टी येथील राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी पायल यशवंत कडूस हिने स्वतः मास्क तयार करून आपल्या आसपासच्या परिसरातील राहणाऱ्या लोकांच्या घरी जाऊन वैयक्तिक सर्व्हे करून लोकांना स्वतः बनवलेल्या मास्क व साॅनिटायजरचे वितरण केले.
आरोग्य विषयी चांगले मार्गदर्शन केले. सर्वांना कोरोना पासून बचाव करण्यासाठी घराबाहेर पडू नये व जर महत्त्वाच्या कामला घराबाहेर पडलात तर घरात येताना हात स्वच्छ साबणाने धुवून घ्यावेत असे सांगितले. कोरोनाचा हिंमतीने पराभव करण्याचे आव्हान देखील पायलने केले आहे.
मास्क तयार करण्यासाठी पायलच्या आईने देखील मदत केली आहे. त्या भिंगार हायस्कूल मध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. पायलने सांगितले की या कामासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी धनंजय लांडगे आणि काॅलेजचे प्राचार्य सुनिल निर्मल यांचे मार्गदर्शन लाभले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष