पोलिस आयुक्त ॲक्शन मोडवर; अधिकारी रात्री उशिरापर्यंत ठाण्यात

पुणे, २२ डिसेंबर २०२२ : पुणे शहर पोलिस आयुक्त म्हणून पदभार घेतल्यानंतर रितेश कुमार यांनी पहिली आठवडा बैठक आज बोलविली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व पोलिस ठाण्यांतील प्रभारी अधिकारी, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस आयुक्त बुधवारी रात्री उशिरापर्यंत आपल्या कार्यालयात तळ ठोकून होते. बैठकीच्या ठरविण्यात आलेल्या रूपरेषेनुसार प्रत्येक मुद्याला अनुसरून माहिती एकत्र करण्यात येत होती.

ठाण्याचे प्रभारी अधिकारी आपल्याकडून बैठकीसाठी दिलेला एकही मुद्दा सुटणार नाही, याची काळजी घेत होते. त्यामुळे तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या कार्यकाळातील आठवडा बैठकीची आठवण झाल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सर्व माहिती एकत्र केल्यानंतर प्रत्येक परिमंडळातील पोलिस उपायुक्तांनी तेथील सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बुधवारी रात्री उशिरापर्यंत आपल्या कार्यालयात बैठक घेतल्याचे समजते आहे.

या बैठकीत महत्त्वाचे मुद्दे अमली पदार्थविरोधी कारवाई अधिक व्यापक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, पब, बार व ऑनलाईन तस्कारांवर नजर ठेवून कडक कारवाई केली जाणार आहे. रात्रीच्या वेळी निवासी भागात रूफ टॉप हॉटेल्स व पबमुळे होणारे ध्वनिप्रदूषण व नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी पोलिस कारवाई करतील; तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांची प्रभावी गस्त ठेवण्यासाठीही उपाययोजना केल्या जाणार आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा