प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळी डॉक्टर गैरहजर असल्यास निलंबनाची कारवाई, आयुक्त तुकाराम मुंडेंचा इशारा

पुणे, दिनांक ७ ऑक्टोबर २०२२ : तुकाराम मुंढे यांची प्रशासकीय सेवेमध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख आहे. त्यांनी आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य विभाग आयुक्त पदाचा पदभार नुकताच स्वीकारला आहे. आरोग्य विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच मुंडे यांनी आपल्या कामाचा धडाका उठवला आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी मध्यरात्री राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय त्याचबरोबर जिल्हा रुग्णालय या ठिकाणी रात्रीच्या वेळी धाडसत्र सुरू केले. यावेळी त्यांच्याबरोबर आरोग्य उपसंचालक जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते. रुग्णालयांची तपासणी केल्यानंतर ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळी डॉक्टर गैरहजर असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

या धाडसत्रात पुण्यामध्ये आळंदी आणि वाघोली या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये तपासणी करण्यात आली. या ठिकाणी डॉक्टर कर्तव्यावर उपस्थित असल्याने कारवाई झाली नाही.

आरोग्य भवन येथील कार्यालयामध्ये डॉ. रामास्वामी एन यांच्याकडून मुंडे यांना पदभार देण्यात आला. राज्यातील नागरिकांना सहज सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या होत्या. आरोग्य विभागात आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच मुंडे यांनी धडाकेबाज कामास सुरुवात केली आहे.

राज्यातील जनतेला ग्रामपंचायत स्तरापर्यंत साध्या सहज आणि माफकरीत्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी, सर्व निर्देशांकावर चांगले काम करण्याची अपेक्षा डॉ. रामास्वामी यांनी व्यक्त केली होती. महाराष्ट्रात आरोग्य सुविधांपासून कोणीही वंचित राहू नये. सार्वजनिक आरोग्य सेवा अत्यावश्यक असून शासकीय आरोग्य संस्था २४ तास सुरु ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा