दक्षिण आशियाई स्पर्धेवर भारताचा बहिष्कार

36

मुंबई: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी या खेळाचा समावेश न केल्यामुळे भारतीय खेळाडू नाराजी व्यक्त करत आहेत. अनेक वर्ष स्पर्धेसाठी सराव हे खेळाडू करत असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदक आणण्यासाठी यांनी कसून तयारी केलेली असते. परंतु राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी या खेळाचा समावेश न केल्यामुळे त्या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा विचार भारतीय ऑलिम्पिक संघटना करीत असतानाच आता भारताच्या संघांना प्रवेश नाकारला जात असल्यामुळे दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा वर बहिष्काराचा विचार सुरू करण्यात आला आहे.
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत अनेक खेळाडू दुय्यम संघ पाठवल्यानंतर ही भारत पदकांची लयलूट करतो. यापूर्वी कधीही या स्पर्धेत कोणीही बहिष्काराचे हत्यार उचलेले नव्हते; पण आता भारताची पदके कमी करण्यासाठी हा उपाय केला जात असल्याचा आरोप भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी करीत आहेत.