पुणे ८ ऑक्टोबर २०२०: होतकरू व नेतृत्व गुण असणाऱ्या तरुणांना एकत्र करून प्रत्येक गावात ग्राम विकास युवा समिती स्थापन करुन या समिती मार्फत केंद्र सरकार व राज्य सरकरच्या योजना ग्रामीण भागातील तरुणांपर्यंत पोहचवाव्या असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी केले आहे.
आज नेहरू युवा केंद्राच्या वतीने जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या अध्यक्षत्याखाली पार पडली यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर ,राज्याचे संचालक प्रमोद हिंगे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक कार्तिकेयन ,जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे ,जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान राष्ट्रीय युवा पुरस्कारथी व समिती सदस्य उपस्थित होते.यावेळी कोविड १९ ,माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत या युवकांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या संपर्क अभियानाचे आज उदघाटन करण्यात आले.यावेळी देशमुख म्हणाले देशातील युवा शक्तीचा उपयोग हा ग्रामीण भागाच्या विकासासाठी व विधायक कार्या साठी होणे गरजेचे आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांना गती मिळेल यासाठी केंद सरकारच्या सर्व योजना आहेत.यासाठी ग्रामपंचायत समितीने मदत करावी.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव