बारामती, दि. २६ जून २०२० : धनगर समाजाच्या विरोधात सोशल मीडियावर वादग्रस्त विधान करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यास गेल्यावर बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी अपमानास्पद वागणूक देऊन भावना दुखावल्याची तक्रार आज शुक्रवारी दि २६ रोजी करण्यात आली आहे.
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या बद्दल पंढरपूर येथे वादग्रस्त विधान केल्यावर राज्यातून अनेक पडसाद उमटले होते. यामध्ये काही लोकांनी सोशल मिडियावर धनगर समाज्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरले असल्याचे सांगत धनगर समाजाच्या वतीने बारामती शहर पोलीस ठाण्यात काल दि २५ रोजी सोशल मिडीयावर पोस्ट करणाऱ्या प्रदीप खोब्रागडे, दीपक जाधव, व सदाशिव गिरी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी याबाबत निवेदन देण्यास गेले होते.
यावेळी पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने आज शुक्रवार दि २६ रोजी औदुंबर पाटील यांच्यावर योग्याती कारवाई करावी असे निवेदन देण्यास आलेल्या लोकांची व पाटील यांचे व्हिडिओ शूटिंग काढण्यावरून शाब्दिक चकमक झाली होती.
यानंतर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या मांडल्यावर विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून सोशल मीडियावर वादग्रस्त विधान करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच याबाबत तालुका पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यास सांगितले. यावेळी अभिजित देवकाते ,ऍड अमोल सातकर, ऍड दिलीप धायगुडे, निलेश धालपे, नवनाथ मालगुंडे, वैभव सोलनकर यांच्याशी कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव