कोरिओग्राफर गणेश आचार्यविरोधात तक्रार दाखल

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यविरोधात एका ३३ वर्षीय नृत्य दिग्दर्शिकेने अंबोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. गणेश आचार्य कमिशनची मागणी करत अश्लिल व्हिडीओ पाहण्यासाठी बळजबरी करत असल्याचा गंभीर आरोप या महिलेने केला आहे.

इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोसिएशनचा गणेश आचार्य हा महासचिव देखील आहे.
महासचिव बनल्यापासून मानसिक छळ करत होता. विरोध केल्यावर गणेशने सदस्यत्व रद्द केले, ज्यामुळे तिचे उत्पन्न बंद झाले.
दुसऱ्या नृत्य दिग्दर्शकाकडे काम मागण्यास गेल्यावर आधी गणेशशी भांडणे मिटव आणि मगच आमच्याकडे ये असा सल्ला मिळायचा.
२६ जानेवारीला माझे सदस्यत्व का रद्द केले? असा जाब विचारल्यावर गणेश आचार्य संतापला आणि त्याने त्याच्या सोबतच्या कोरिओग्राफर्सला सांगून पीडितेला बाहेर हाकलले.

दोन महिला कोरिओग्राफर्सनी पीडितेला मारहाण केली. पीडिता गणेशच्या आॅफिसात जायची तेव्हा तो तिला अश्लिल व्हिडीओ पाहण्यास बळजबरी करायचा. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ कोरिओग्राफर सरोज खान यांनीही गणेश आचार्यवर गंभीर आरोप केले होते. नव्या डान्सर्सला गंडवत असल्याचा आरोप होता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा