नवी दिल्ली, २५ सप्टेंबर २०२०: प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना – “सौभाग्य” ने स्थापनेला तीन वर्षे पूर्ण केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण तसेच शहरी भागातील देशातील इच्छुक कुटुंबांचे विद्युतीकरण सुनिश्चित करण्यासाठी २५ सप्टेंबर, २०१७ रोजी ही योजना सुरू केली होती.
ग्रामीण भागातील सर्व घरांमध्ये आणि देशातील शहरी भागातील सर्व गरीब कुटुंबांना शेवटची मैल कनेक्टिव्हिटी आणि वीज जोडणी देऊन सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली गेली आहे.
ही योजना १६,३२० कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन करून करण्यात आली. एकूण रक्कामेपैकी ग्रामीण घरांचा खर्च १४ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे, तर शहरी कुटुंबांसाठी हा खर्च २,२९५ कोटी रुपये आहे. सौभाग्य योजनेंतर्गत आतापर्यंत सुमारे २ कोटी ६२ लाख घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: