गोल पोस्ट अर्थ रोजगार कंपनीच्या आवारात अभियंत्यांची आत्महत्या

कंपनीच्या आवारात अभियंत्यांची आत्महत्या

पुणे : हिंजवडी येथील टीसीएस कंपनीत डेटा एन्ट्रीचे काम करणाऱ्या एका अभियंत्याने कंपनीच्या आवारातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.३) रोजी सकाळी उघडकीस आली.
कपील गणपत विटकर (वय ३९) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. तो सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे कामावर आल्यानंतर ६ व्या मजल्यावर जाऊन जिण्यात लोखंडी पाईपला प्लस्टिकचा टॅग बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याचे हिंजवडीचे पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी सांगितले.

कपिल गेली साडेतीन वर्षापासून टीसीएसमध्ये नोकरीला होता. तो आपल्या परिवारासह उंडरी येथील वडाचीवाडी मध्ये वास्तव्यास असून त्याला पाठदुखीचा त्रास होता अशी माहिती देखील पोलिसांना मिळाली आहे. कंपनीतील कामाच्या ताणामुळे की आजारामुळे त्याने आत्महत्या केली याचा शोध पोलीस घेत आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version