कोलकाता नाईट रायडर्स संघाची चिंता वाढवणारी बातमी

दुबई, ११ ऑक्टोबर २०२०: काल झालेल्या आयपीएल २०२० मधील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्स इलेवेन पंजाब यांच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने २ धावांनी विजय मिळवला. पंजाब संघाला शेवटच्या चेंडूवर ७ धावांची गरज असताना. ग्लेन मॅक्सवेल याने चौकार मारला आणि कोलकाता संघाने सामना २ धावांनी आपल्या नावावर केला.

या अत्यंत रोमांचक सामन्यात शेवट पर्यंत कोणालाच माहिती नव्हते सामना कोण जिंकणार आहे. शेवटच्या षटकात सुनील नरेन याने सामना जिंकवला. सुनील नरेन याने शेवटच्या २ षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. यामुळेच कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळाला. याआधी पंजाब संघ फलंदाजी करत असताना असे वाटत होते जणू पंजाब संघ एकहाती सामना जिंकेल. परंतु सुनील नरेनच्या गोलंदाजीमुळे हे शक्य झाले नाही.

काल सामना झाल्यानंतर अंपायर्स तर्फे सुनील नरेन याला गोलंदाजीच्या अॅक्शनमुळे चेतावणी देण्यात आली आहे. आणि सांगण्यात ही आले, जर पुन्हा त्याच्या अॅक्शन मध्ये चूक आढळून आली तर या आयपीएल २०२० मध्ये सुनील नरेन याला गोलंदाजी करता येणार नाही. त्याच्या गोलंदाजी करण्यावर बंदी घालण्यात येईल. यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा फटका बसू शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा