नवी दिल्ली, २४ नोव्हेंबर २०२०: गेल्या काही आठवड्यांपासून दिल्ली अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. एकीकडं, कोरोनाच्या नवीन प्रकरणांची गती कमी होत नाही तर दुसरीकडं, मृतांची संख्याही १०० च्या जवळपास आहे. दाट लोकवस्ती असलेल्या भागात आणि बाजारपेठेत गर्दीमुळं कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढलं आहे. दिल्लीत कोरोनाव्हायरस येणाऱ्या प्रत्येक दिवशी भयावह होत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून सणासुदीच्या कारणास्तव आणि इतर कारणांसाठी बाजारामध्ये गर्दी होती. हेच कारण आहे की, रुग्णालयात कोरोनामुळं मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही वाढत होती.
कोविड -१९ विषाणूमुळं, दर तासाला सरासरी ५ लोक मरत आहेत. दिल्लीत सलग चौथ्या दिवशी कोरोनामुळं १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. गेल्या २४ तासांत राजधानीत १२१ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ४४५४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याच वेळी, २४ तासांत कोरोनाला पराभुत करणारे ७ हजाराहून अधिक लोक आहेत.
कोरोना संसर्गाची परिस्थिती आणि त्यास सामोरे जाण्याच्या उपाययोजनांबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली सरकारला फटकारलं आहे. कोरोना दिल्लीत अजूनही नियंत्रणात आलेला नाही आणि कोविड व्यवस्थापनाची यंत्रणा दिल्लीत का बिघडली आहे, असा सवाल कोर्टानं केजरीवाल सरकारला केला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता डिसेंबरमध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, अशी भीती न्यायालयानं व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारांना ३ दिवसात स्थिती अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे