राजगुरूनगर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सांडभोरवाडी(ता.खेड) येथे सोमवारी (दि. २०) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. सांडभोरवाडी ग्रामपंचायत,तीन गावचे पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या या शिबिरात ८९ जणांनी रक्तदान केल्याची माहिती राजगुरूनगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा सरपंच अरुण थिगळे यांनी दिली.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शिबिराचा प्रारंभ करण्यात आला.रक्तदान शिबिरात गावातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल त्यांचे कौतुक करून आमदार मोहिते पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. कोरोना संकटामुळे विकास कामांना खीळ बसणार असली तरी नजीकच्या काळात तिन्हेवाडीतील सर्व कामे पूर्ण केली जातील अशी ग्वाही दिली या वेळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यालगतच्या कृषी पंपांचा खंडित केलेला विद्युत पुरवठा मंगळवार (दि २१) पासुन नियमित केला जाईल असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजगुरूनगर शहर अध्यक्ष सुभाष होले, महिला अध्यक्षा मनीषा सांडभोर, पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे, कोहिणकरवाडीचे माजी सरपंच अविनाश कोहिणकर,सातकरस्थळचे विठ्ठल जगदाळे, सांडभोरवाडीचे उपसरपंच अरुण सांडभोर, सदस्य संतोष पाचारणे,तुकाराम पाचारणे , नवनाथ वरकड,माजी सदस्य नानाभाऊ आरुडे,शिवाजी सांडभोर, पोलीस पाटील ऍड. सुषमा आरुडे, किरण कोहिणकर ,त्रिमूर्ती विद्यालयाचे अध्यक्ष पांडुरंग आरुडे, प्रा बाळासाहेब आरुडे, ग्रामसेवक किशोर रायसिंगवाकडे,रोहिदास आरुडे,हुतात्मा राजगुरु ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल पाचारणे,विकास आरुडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सरपंच अरुण थिगळे यांनी सर्वांचे आभार मानले. पिंपरी चिंचवड येथील मोरया ब्लड बँकेने रक्त संकलन केले.
प्रतिनिधी-सुनील थिगळे