रांची ; २ सप्टेंबर २०२२: महाराष्ट्र राज्यात सत्ता आल्या नंतर झारखंडमध्ये ही सत्ता काबिज करण्यासाठी भाजपनं ऑपरेशन लोटस चालू केल आहे. त्यामुळं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आपल्या आमदारांना दुसरीकडं ‘शिफ्ट’ करावं लागलं आहे. झारखंडच्या राजकारणातील सस्पेन्स ठेवण्या साठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन सरकारनं येत्या सोमवारी विधानसभेचं एका दिवसाचं विशेष अधिवेशन ठेवलं आहे. त्याच दिवशी विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. महागठबंधन आमदारांचं संख्याबळ बघता सोरेन सरकार हा ठराव जिंकेल. आणि बिहार, दिल्लीपाठोपाठ झारखंडमध्येही ‘ऑपरेशन लोटस फेल होण्याची शक्यता जास्त आहे.
झारखंडमध्ये कथित खाण वाटप लिलावात घोटाळा झाल्याचा भाजपचा आरोप आहे. तसेच मुख्यमंत्री सोरेन यांनी लिलावात स्वतःच एक खाण घेतली.असून हा ऑफिस ऑफ प्रॉफिट कायद्याचं उल्लंघन केल आहे. असा भाजपने आरोप केला आहे.
सोरेन यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारसया आरोपावर निवडणूक आयोगानं मुख्यमंत्री सोरेन यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस राज्यपाल रमेश बैस यांच्याकडं गेल्या आठवड्यात केली होती पण राज्यपालांनी काही ही निर्णय घेतला नाही.
या काळात भाजपकडून झामुमो, काँग्रेस आणि राजदचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. तर मुख्यमंत्री सोरेन यांनी झामुमो, काँग्रेस आणि राजद आमदारांना छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये हलविलं आहे. तीन दिवसांपासून हे आमदार रायपूरच्या रिसॉर्टमध्ये आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री सोरेन यांनी काल मंत्रीमंडळ बैठक घेत. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सारखे विशेष अधिवेशन बोलवून विश्वासदर्शक ठराव मांडायचा निर्णय सोरेन यांनी घेतला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे