मुंबई, १७ सप्टेंबर २०२० : १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला परंतू मराठवाडा अजून ही निजामांच्या पारतंत्र्यात होता. हैद्राबादच्या निजामाच्या जुल्मी राजवटीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी भारतीय फौजा १३ सप्टेंबर रोजी सोलापूरच्या बाजूने घुसल्या पहाटे ४ वाजता सुरू झाले. नवदुर्गा, तुळजापूर, परभणी करत फौजा पुढे सरकत होत्या आणि बिदर विमानतळावर भारतीय फौजेने हल्ला करत १५ सप्टेंबर ला औरंगाबाद सर केले. अखेर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबादचा सेनाप्रमुख जनरल अल इद्रिस यांनी पुर्ण शरणागती पत्कारली आणि मग हैदराबादचा निजाम देखील शरण आला व मराठवाडा त्याच्या ताब्यातून मुक्त झाला. अशा या ‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिन’ च्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यासह राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. उपमुखमंत्र्यांनी मराठवाडा मुक्तीच्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिन’ च्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुक्ती संग्रामच्या नायकांच्या शौर्य व बलिदानाची आठवण करुन दिली आणि ते म्हणाले की मराठवाड्याचा इतिहास कायम संघर्षाचा राहिला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम मराठवाड्याच्या लढाई आणि शौर्याच्या इतिहासातील एक सुवर्ण पान आहे आणि स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ या दिग्गजांच्या नेतृत्वात मराठवाडा मुक्ती संग्राम ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक समांतर लढा दिला आहे.
मराठवाडा मुक्ती संग्रामात देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी लढा देणाऱ्या वीरांचा देश नेहमी त्यांचा ऋणी राहील, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. नजीकच्या काळात मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वानी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही उपमुखमंत्र्यांनी केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी