उस्मानाबाद, ६ ऑगस्ट २०२०: उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्या पासून प्रशासन अतोनात प्रयत्न करून या कोरोना विषाणू वर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सर्व कर्मचारी या महामारीच्या वेळी दिवसरात्र तैनात होऊन कार्यरत आहेत. पण या महामारी ने लोकसेवा करणाऱ्यांना देखील सोडले नाही.
कोरोनाच्या या महामारी मध्ये कार्यरत असताना अनेक पोलीस कर्मचारी देखील कोरोना बाधीत झाले. मा. पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या प्रयत्नातून तुळजापूर येथील साप्ताहिक बाजार असलेल्या मंदिर संस्थान च्या भक्त निवास इमारतीमधील तिसरा मजला हा उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस दलातील अधीकारी तसेच कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब जर कोरोना बाधीत असतील तर त्यांच्या वर उपचारासाठी तसेच क्वारंटाईन कक्षासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. यासोबतच, त्याठिकाणी त्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी वैद्यकीय अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी देखील नेमण्यात आलेले आहेत.
या संबंधित ठिकाणी उपचार घेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी १० जण हे आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी औषधोपचाराने कोरोना वर मात करून घरी परतले. त्यांना घरी पाठवण्याच्या वेळी पोलीस दलाने या १० पोलीस कर्मचाऱ्यांचे गुलाबाचे फुल देऊन अभिनंदन केले.
न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड