पुणे: काँग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांच्या गाडीला काल पुण्यामध्ये अपघात झाला आहे. हा अपघात भीषण होता आणि या अपघातात कदम हे थोडक्यात बचावले आहे. मात्र त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
ते कराडच्या दिशेने निघाले होते. कराडमध्ये मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांसारखे दिग्गज नेते उपस्थित असणार आहेत. कालची मुंबईमधली बैठक संपल्यावर ते पुण्याला जात होते. काल रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांच्या गाडीला पुण्यामध्ये मोठा अपघात झाला. गाडीमधील एअर बॅग प्रणालीमुळे त्यांचा जीव वाचला.