या सरकारविरुद्ध काँग्रेस एकटीच लढू शकत नाही : के सी वेणुगोपल

21

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी २०२३ : देशात २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार असून, त्यासाठी राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांच्या एकजुटीबाबत काँग्रेसला उद्देशून केलेल्या आव्हानानंतर, सोमवारी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी आपले मत मांडताना एक मोठे विधान केले आहे.

वेणुगोपाल म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजप सरकारसोबत ‘एकटे लढू शकत नाही’. भाजपविरोधी मतांचे विभाजन होण्याची शक्यता कमी करण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट हा अत्यावश्यक घटक आहे. काँग्रेसलाही विरोधी ऐक्याची तेवढीच काळजी आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी अनेक प्रसंगी बरोबरच सांगितले आहे की, सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस एकट्याने या सरकारशी लढू शकत नाही. काँग्रेस आपली लढाई एकट्याने लढत आहे, पण या अलोकतांत्रिक, हुकूमशाही सरकारला सत्तेवरून हटवण्यासाठी विरोधकांची एकजूट हवी आहे. या शक्तींविरुद्ध लढण्यासाठी आम्ही पूर्णपणे विरोधकांच्या एकजुटीसाठी तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, मागील संसदीय अधिवेशनात आमच्या अध्यक्षांनी पुढाकार घेऊन सर्व समविचारी पक्षांना बोलावले आणि अदाणी प्रकरणाविरुद्ध संसदेत एक आवाज उठवला. आमचा व्यापक विचार आहे की आपण भाजपाच्या विरोधात जावे आणि भाजपाविरोधी मतांचे विभाजन करण्याची संधी त्यांना देऊ नये.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा