गोल पोस्ट राजकारण काँग्रेस नेते राहुल गांधी बनले आचारी

काँग्रेस नेते राहुल गांधी बनले आचारी

तामिळनाडू, ३१ जानेवारी २०२१: काँग्रेस नेते  राहुल गांधी हे एका कुकरी शो मधील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. ज्या मध्ये राहुल गांधी यांनी स्वताहा आचारी बनत कुकींग केल्याचे समोर आले आहे. राहुल गांधी अश्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत राहतात. ज्यामधे ते लोकांच्या किती जवळ जाऊन गप्पा गोष्टी करतात ज्याचे व्हिडिओ अजून ही येत आसतात.
तामिळनाडू मधील एक प्रसिध्द कुकरी शो युट्युबवर चालतो. ज्याचे नाव शो व्हिलेज कुकींग चॅनेल असे आहे. ज्यामधे वेगवेगळे पदार्थ नेहमीच बनवले जातात आणि या शोमधेच राहुल गांधीनीं गावकऱ्यांसोबत मिळून मशरूम बिर्याणी बनवली. तसेच त्याचा आस्वाद ही घेतला. राहुल गांधी यांनी जमिनीवर बसून जेवणाचा आस्वाद घेतला.
हा व्हिडिओ युट्युबवर आल्यापासून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आत्ता पर्यंत या व्हिडिओ ला ६.८ मिलियन लोकांनी पाहीले आहे. तर ५६५ हजार लोकांना लाईक केले आहे. या व्हिडिओला ४३ हजार कमेंट आल्या असून राहुल गांधी यांच्या साधेपणाचे कौतुक होताना दिसत आहे. तसेच राहुल गांधींनी या शो मधील गावकर्यांसोबत मिळून गप्पा देखील मारल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव
error: Content is protected !!
Exit mobile version