कर्नाटकात काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल, मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या, की डी के शिवकुमार यांची वर्णी लागणार

बंगळूरु,१३ मे २०२३ : कर्नाटकात काँग्रेसने विजय घोडदोड करत बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे. कॉंग्रेसला बहुमत मिळाले तर कॉंग्रेसचे सर्वात मोठे नेते म्हणून सिद्धरामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार, की डी.के. शिवकुमार यांची वर्णी लागणार याकडे नजरा लागल्या आहेत.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसच्या कार्यालयात उत्साहाचे वातावरण आहे. हाती येत असलेल्या निकालांचा कल कायम राहीला तर कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. अशात आता कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे.

कर्नाटक मध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. कर्नाटकात १० मे रोजी विधान सभेच्या २२४ जागांसाठी मतदान झाले. या निवडणूकात कॉंग्रेस , भाजप आणि जेडीएसमध्ये मोठी टक्कर होती. सुरुवातीच्या निकालांच्या कलानुसार कॉंग्रेसचे सरकार तयार होण्याची शक्यता आहे. जर कॉंग्रेसचे सरकार बनले तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार हे दोघेही आहेत. आता या दोघांमधून मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा