मुंबई, 20 जून 2022: विधानपरिषद निवडणुकीचा निकाल सध्या लांबणीवर पडलेला दिसतोय. कांग्रेस ने भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्षम जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. राज्यसभा निवडणुकीदरम्यान सुद्धा असा प्रकार समोर आला होता. त्यावेळी भाजपने आक्षेप घेतला होता आणि माहाविकास आघाडीचं एक मत बाद झालं होतं.
काय आहे आक्षेप
भाजपचे आमदार लक्षण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी मतदान करताना असिस्टंट चा उपयोग केला. म्हणजेच त्यांनी स्वतः मत दिलं नाही. ज्या अर्थी ते सही करू शकतात त्या अर्थी ते मतदान देखील करू शकतात असा आक्षेप काँग्रेसकडून घेण्यात आला होता.
राज्य निवडणूक आयोगाकडून आक्षेप फेटाळला
सध्या हा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाकडून फेटाळण्यात आला आहे. त्यामुळं काँग्रेसची निराशा झालेली दिसत आहे. भाजप नेत्यांकडून देखील काँग्रेसच्या या अक्षेपावर संताप व्यक्त केला आहे. आता काँग्रेस ने हे आक्षेप घेतलेलं पात्र केंद्रीय निवडणुक आयोगाकडे पाठवलं आहे. त्यामुळं जोपर्यंत निवडणूक आयोग निर्णय घेत नाही तोपर्यंत मतमोजणी सुरू होणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे