नवी दिल्ली, दि.२१ मे २०२०: पीएम केअर फंडाबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संभ्रम निर्माण केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर कर्नाटक येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कर्नाटक येथील शिवमोगा येथे एका वकिलाने ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार हा स्वत: वकील आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याचीही माहिती समोर येत आहे.
सोनिया गांधी यांच्या विरोधात दाखल झालेला हा गुन्हा हा काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन केलेल्या ट्विटबद्दल आहे.
प्रवीण केवी नामक एका व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने ११ मे रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शिवमोगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी