इंधनविरोधात काँग्रेसचे निदर्शन

मुंबई १० जुलै, २०२१: इंधनविरोधात मुंबईमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली. यावेळी अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी अनेक झेंड्याबरोबर सिलेंडर गॅस घेऊन या आंदोलनात सहभागी झाले. काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात घोषणा देत होते. इंधनवाढीच्या विरोधात त्यांनी बैलगाड्यांचादेखील वापर त्यांनी केला. अनेक कार्यकर्ते कालांतराने या बैलगाड्यांवर चढले आणि घोषणा देऊ लागले. त्या बैलगाड्यावर अतिरिक्त वजन झाल्याने त्या बैलगाडीचा तोल गेला आणि भाई जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते जमिनिवर पडले. त्यांच्या हातातील सिंलेंडर सुदैवाने फुटले नाहीत आणि कोणतीही दुर्घटना झाली नाही. पण कार्यकर्त्यांना गंभीर दुखापत झाली. याच निदर्शनात त्यांनी सायकलींचादेखील वापर केला. ज्या वाहनांना इंधन लागत नाही, अशा अनेक वाहनांचा उपयोग करुन हे निदर्शन करण्यात आलं. कोरोनाच्या काळात वाढणारी महागाई आणि त्यातून इंधनवाढ म्हणजे सर्वसामान्यांची होणारी गळचेपी, याविरोधातले हे आंदोलन केंद्र सरकारच्या डोळ्यात अंजन घालेल का ? हे पहाणं गरजेचं ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा